Saturday, August 7, 2010

आवारा - By Facebook (आवारा)

पुण्यनगरीत ('विद्येचे माहेरघर' फेम) वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे ! रक्त बासुंदीसारखं आटवून आटवून सांगितलं आणि कितीही समाजप्रबोधन केलं तरी अजूनही परिस्थिती गंभीरच आहे.

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आजही.. हो हो ह्या आजच्या युगात, आजच्या दिवशी, काही तुरळक लोक अजूनही सिग्नल पाळत आहेत ! आधुनिक समाजातल्या बहुसंख्य लोकांप्रमाणे सिग्नल, लेन, वेगमर्यादा वगैरे जुनाट वाईट चालीरिती झुगारून देण्याचे धाडस त्या सामान्य लोकांच्या अंगी नाहीच. पण जपून वाहने चालवणे, उजव्या साईडनेच ओव्हरटेक करणे, नेमून दिलेल्या जागेतच पार्कींग करणे आणि सर्वात दुर्दैवी म्हणजे हॉर्नचा वापर कमीतकमी करणे वगैरे प्रकारही काही मोजक्या लोकांकडून अजूनही चालू आहेत.


हे कुठेतरी थांबायला नको का ???


ह्या निवडक मूर्ख लोकांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती देशाला कुठे घेऊन जाईल ह्याचा विचार मनात आला तरी मेंदूत वाहतूक मुरंबा होतो ! पण मुळातच हे लोक 'रस्त्यावर' यावेत का हाच प्रश्न आहे !


सुदैवाने वाहतूक खात्याने ह्यावर तातडीने उपाययोजना करायचे ठरवले आहे. पुणे वाहतूक शाखेने नवीन परवाना ' काढायला ' येणाऱ्यांसाठी खास प्रश्नावली बनविली आहे. आता आठचा आकडा काढून परवाना घ्यायची पद्धत जाउन ह्या सर्व कठीण प्रश्नांची योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरे देण्याऱ्यासच ह्यापुढे परवाना मिळु शकेल !

प्रश्नावली:

प्रश्न १. पुण्यात वाहतूक सौजन्य दिन साजरा करण्याचे ठरत आहे. त्यासाठी सर्वात चांगला दिवस कुठला ?

* दर महिन्याच्या बत्तीस तारखेला
* सडपातळ अंगयष्टी असलेला ट्रॅफिक पोलिस दिसेल त्या दिवशी
* रिक्षावाले तिरके न बसता सरळ बसू लागतील त्या दिवशी

प्रश्न २. चालकासाठी रस्त्यावर परीक्षा देण्यास सर्वात योग्य दिवस :

* गटारी अमावास्येला रात्री ११ वाजता
* ट्रॅफिक पोलिस, सिग्नल वगैरे नसलेल्या चौकात 'पालखी'च्या दिवशी
* सर्व धरणांचे सर्व दरवाजे उघडावे लागतील अशा 'रिमझिम' पावसाच्या दिवशी

प्रश्न ३. '१०० मीटर पर्यंत वाहने उभी करु नये' हा बोर्ड पाहून तुम्ही काय करणे अपेक्षित आहे ?

* घरुन टेप घेउन निघावे व टेपने मोजून बरोबर अंतरावर गाडी लावावी
प्रत्येकाने हाताची एक 'वीत' म्हणजे किती सेन्टिमिटर ते लक्षात ठेवावे आणि बोर्डपासून १०० मिटर होइपर्यन्त वीता मोजून मग गाडी लावावी
* बोर्डवर सोसायटीच्या गणेशोत्सवातल्या स्पर्धांचे राहिलेले पोस्टर लावावे
* बोर्ड उखडून आडवा ठेवावा



प्रश्न ४. तुम्ही अलिशान चार चाकी चालवताना सिग्नल तोडलात आणि पकडले गेलात. वाहतूक पोलिसाने हसुन गाडीकडे पहात हात खाजवत 'काय करता साहेब' अशी सुरुवात केल्यास..

* गाडीचा ड्रायवर असल्याची बतावणी करुन खिशात फक्त सव्वा रुपया आहे असे सांगावे
* झटकन आंधळे असल्याची बतावणी करावी व क्रॉस करण्यास मदत मागावी
* पोलीसाशी हस्तांदोलन करावे आणि 'आज इकडे कसे काय? ऑफ ड्यूटी आहात का?' असे विचारावे !
* चालू फॅशनच्या पक्षाचा झेंडा कायम गाडीत ठेवावा व अशा वेळी झटकन लावावा



प्रश्न ५. लाल सिग्नल असल्यास...

* सिग्नललाच ठोकावे म्हणजे पुढच्या वेळी लाल दिव्याचा त्रास होणार नाही
* हिरवा सिग्नल मिळालेल्या काटकोनात असलेल्या गाड्यांमधे आपली गाडी खुशाल घुसवावी आणि वर आपणच त्रासिकपणे खांदे उडवत रहावे !
* करकचून ब्रेक दाबावा व थांबावे .. पण त्याआधी गाडी सिग्नल पार करून चौकात मधोमध आहे ना ह्याची खात्री करावी


प्रश्न ६. हिरवा सिग्नल असल्यास..

* गाडी कासवाच्या वेगाने चालवून आयत्या वेळी सटकावे आणि बरोब्बर मागच्या गाडीला लाल सिग्नलला अडकवून असूरी आनंद घ्यावा.
* उजवीकडे लांबपर्यंत डिव्हाईडर असूनही उजवा इन्डिकेटर देउन मागच्यास गोंधळात टाकावे
* सिग्नल ओलांडून गाडी चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून पत्ता विचारावा.

प्रश्न ७. सिग्नल तोडताना पोलीसाने शिट्टी मारल्यास..

* आपणही दुप्पट जोरात शिट्टी मारावी
* पोलिसाला घरी आया बहिणी नाहीत का विचारावे !
* बाजूच्या स्कुटरवाल्याच्या हेल्मेटची काच वर करुन 'ते तुम्हाला बोलवताहेत' असे सांगावे
* दोन शिट्ट्यांच्या मधे 'जागते रहो' असे ओरडावे


प्रश्न ८. लाल सिग्नलला आपल्या पुढचा थांबल्यास..

* त्याला सुसाट ठोकून आपणच वाईटातली वाईट शिवी द्यावी
* ठोकता नाही आले तर बाजूने जाऊन 'चल ना.. सिग्नल दिसत नाही का' असे तुसडेपणाने म्हणावे व रागात बघत निघून जावे
* सिग्नल सुटायला वेळ असेल तर त्याच्या गाडीवर ब्लेडने 'वाटेल तिथे थांबू नये' असे कोरावे


प्रश्न ९. 'एकदिशा मार्ग' असा बोर्ड पाहिल्यास..

* आपल्याला हव्या त्या कुठल्याही एका दिशेने जावे.
* त्या गल्लीत जाताना बोर्डवरच्या बाणाचे तोंड आकाशाकडे वळवावे (मागचा ट्राफिक एकदम कमी होईल !)
* बरोबर विरुद्ध दिशेने जाउन बरोबर दिशेने एकेरी वाहतुक करणारे 'एकेरी'वर येतील असे बघावे

प्रश्न १०.उजवीकडे वळायचे असल्यास काय कराल ?

* दुचाकीवर असाल तर.. तर काय ? असाल तसे वळा !!!
* चारचाकीत गाडीतल्या पाठच्या पुढच्या सर्व लोकाना खिडकीबाहेर सर्व दिशाना हात दाखवून अगम्य खुणा करण्यास सांगावे.
* शक्यतो सर्वात डावीकडच्या लेन मधे गाडी ठेवुन वळायचा सिग्नल जवळ येईल तशी जोरदार उजवीकडे वळण्यास सुरुवात करावी.


प्रश्न ११. 'जड वाहनास प्रवेश बंद' अशी पाटी पाहिल्यास

* बायकोस गाडीतून खाली उतरण्यास सांगावे
* त्यानेही नाही काम भागले तर आजूबाजूच्या गाडीवाल्याना दोन चार शिव्या देउन मन हलके करावे
* ट्रक चालवत असल्यास पाटीपर्यंत जाऊन ती वाचावी आणि मग ट्राफिक जॅम झाल्यावर रिव्हर्स घ्यायला सुरुवात करावी.


प्रश्न १२.अतिशय बुद्धिमान व सुजाण नागरिक असल्याचे सर्वात उत्तम लक्षण कोणते ?

* तुम्ही लहान मुलाची माता असाल तर रस्त्याकडेने चालताना तुमच्या मुलाला ट्रॅफिकच्या साईडला ठेवुन आपण दुसरीकडे वेंधळेपणे बघत चालणे.
* अतिशय भिकार अशी 'लेटेस्ट ट्यून' हॉर्नवर वाजवायचा प्रयत्न करणे !
* चार चाकीची आर्थिक ऐपत आली तरी जुने दिवस न विसरता ती दुचाकी सारखी चालवणे व कायम तिरकी घुसवण्यास बघणे.
* समोरच्याचे डोळे पांढरे होतील आणि त्याच्या भावी पिढ्याही आंधळ्या निपजतील इतका 'हाय बीम' उगाचच मारणे !!!

आणखी हवे आसतिल तर ....
तोंडाचे पुस्तक येथे टिचकी मारा .

Sunday, July 25, 2010

पुरंदर

नारायणपुर रोड वरुण दिसणारे पुरंदर चे अप्रतिम दृश्य.

दर वर्षी पावसाला सुरु ज़ाला की आमचा ठरलेला दिवसाच्या ट्रीचा बेत,
सह्याद्रीच्या दक्षीनोतर पसरलेल्या रांगेतुन काही फाटे पुर्व दिशेकडे फुटले आहेत . त्या पैकी एका फाटया वर सिहगड आहे. याच डोंगरावर पूर्वेकड़े अंदाजे २४ कि.मी. वर बापदेव, दिवे आणि कात्रज घटाच्या पलीकडे जो छानसा किल्ला आहे तोच पुरंदर . तीन्ही घाट ओलांडून आपन पुरंदरच्या पायथ्याला पोचु सकतो पुण्याहून अगदीच म्हणाल तर जास्तीत जास्त .३० तासाचा रस्ता . पावसाल्यात अगदी मासोप्त भिजन्यासाठी जावे म्हणाल तर पुरंदर सारखा किल्ला नाहीच .
पुरंदर वरचे एक चर्च .
पुरंदर हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारचा आहे . या गडाची समुद्र सपाटी पासून ऊँची अंदाजे १५०० मीटर आहे . पुण्यापासून जायचे म्हणले तर एस. टी. अगदी पुरंदरच्या पायथ्या पर्यंत सोडते . पुरंदर किल्ला हा अंदाजे १००० ते १२०० वर्षापूर्वीचा असल्याचा अनुमान आहे,पुरंदर म्हंजे इंद्र ,ज्याप्रमाणे इंद्र हा बलवान होता त्याप्रमाणे हा पुरंदर सुद्धा बल्याध्य आणि मजबूत आहे . पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत असे आहे .मारुतीने द्रोणगिरी पर्वत उचलून नेताना काही भाग खाली पडला तोच हा इंदानील पर्वत .


हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला .पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाईत आला . ई.स . १६४९ मध्ये आदिलशाने शहाजीराजना कैदेत टाकले , याच वेळी शिवाजी राज्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला .
बनी दरवाजा
पायथ्या पासून वर चढून गेल्या नंतर पुरंदर माचीवर जो एकमेव दरवाजा लागतो तोच बनी दरवाजा तो आजही चांगल्या स्तिथीत आहे .दरवाज्यातून आत गेल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो तर एक डावीकडे मागे जातो ,सरळ पुढे गेलो तर लास्क्रा च्या बारकी दिसतात .तर उजवीकडे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तेच पुरांदेराश्वाराचे . जवळच पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आणि त्यांच्या वाड्याचे काही आवसेस दिसतात .या वाड्यातच सवाई माधव रावाचा जन्म झाला होता .


पाण्याचे टाके

बाले किल्ल्या पासून वर गेल्या नंतर आपण दिल्ली दरवाज्य पाशी पोचतो . वर फिरत जाताना आपल्याला बरेच पाण्याचे टाके ,वाड्याचे अवशेष ,तसेच अंबरखान लागतो . अगदी शेवटी महादेवाचे मंदिर लागते ज्याचा थोरल्या बाजीरावांनी जीर्णोद्धार केला होता .


धुक्यात हरवलेला वज्रगड.
पुर्ण पुरंदर फिरण्यासाठी एक दिवस लागतो आणि आपण पुरंदर बरोबर त्यालाच लागून असलेला वज्रगड पण पाहू सकतो. तर नक्की एका दिवसाच्या ट्रिप साठी निसर्गाच्या सनिध्ह्यत जाऊन याच.
पुरंदर वरील महादेवाचे मंदिर.

Sunday, July 18, 2010

सीमाप्रश्नाविषयी थोडेसे....

अलीकडे रोज पेपर उगधला की एकच बातमी नक्की पहायला मिळेल महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न ,
"सारे विश्वची माजे घर" असे म्हाननाऱ्या संत द्यानेशवरंच्या मराठी भूमिचा हा प्रश्न . गेले बराच वर्ष हा सीमा वाद सुरु आहे . एवढेच नव्हे तर हा वाद चिघळला असून कर्नाटक सरकारतर्फे सीमाभागात राहणाऱ्या मराठीभाषकांवर अत्याचार सुरु आहेत आणि त्या साठी मुख्यमंत्री चव्हाण याना दिल्ली गाठावी लागली .

कन्नड़ कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना भगव्या ध्वजाचा अवमानही केला . भगवा हातातून उडवून फेकून देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मजल मारली. त्यानंतर त्याचे त्यांनी दहन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे त्यांनी दहन केले. त्या निषेधार्थ विविध मराठी संघटनांनी पुकारलेल्या बेळगाव, निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .



एवढे सारे होत असताना केंद्र सर्कार मात्र धिम्म बसून आहे . कन्नड़ कार्यकर्त्यांनी केलेल्या नस्धुसिनी विनाकारण सामान्य जन जीवन विस्कलित होते आहे . आशा परीस्तितित जिथे केंद्र सरकारने हस्तक्षेकरायला हवा तिथे तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याना करावी लागत आहे . मग नक्की सर्कार करत तरी काय आहे हा प्रश्न पडतो .


डॉ बाबा साहेब आंबेडकर याना सुधा मानले आहे की भारतात जी प्रान्त रचना जाली ती भाषावार प्रान्त रचना जाली , भारतात पंजाब, बिहार, ओरिसा ,बंगाल या राज्यांची भाषावार प्रान्त रचना जली असेल तर मग महाराष्ट्रची का नाही .जर बेलगाव हे मराठी भाषीकंचे असेल तर ते महारष्ट्र्रातच हवे .

कर्न्नाटक सरकार हे अगदी उघड पने मराठी लोकांवर अपला हक्क सांगत आहे . यात केंद्र सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे नाही तर उगाच पुन्हा एकदा राजकीय ,सामजिक अस्थिरता व्हायाला वेळ लागनार नाही ........